avatar
Devendra Fadnavis
@DevendraGFadnavis
08.05.2026 22:06
Devendra Fadnavis CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration and stone plaque unveiling of the 'Renovated Future Ready Andheri R.S. Post Office' under the Jan Sewa Connect Project at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Jyotiraditya Scindia. MLA Ameet Satam and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते जन सेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत 'नूतनीकृत भविष्यसज्ज अंधेरी आर.एस. टपाल कार्यालया'चे उदघाटन व कोनशिला अनावरण. यावेळी आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे इनके करकमलों से जन सेवा कनेक्ट परियोजना के अंतर्गत 'नवीनीकृत भविष्य के लिए तैयार अंधेरी आर.एस. डाकघर' का उदघाटन व कोनशिला अनावरण। इस अवसर पर विधायक अमीत साटम एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.35pm | 8-5-2026📍Andheri, Mumbai | संध्या. ६.३५ वा. | ८-५-२०२६📍अंधेरी, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #JanSevaConnect
CMO Maharashtra Tweets:

जनतेला अधिक सक्षम सेवा देणारे भविष्यसज्ज पोस्ट ऑफिस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आज अंधेरी, मुंबई येथे जन सेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत 'नूतनीकृत भविष्यसज्ज अंधेरी आर.एस. टपाल कार्यालया'चे उदघाटन व कोनशिला अनावरण पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोस्ट विभागाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत नव्या स्वरूपातील पोस्ट ऑफिस आता जनतेच्या सेवेत दाखल होत असल्याचा आनंद आहे. वारसा व आधुनिकतेचा सुंदर संगम साधत नव्याने उभारण्यात आलेल्या या टपाल कार्यालयामुळे नागरिकांना अधिक सक्षम व आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत.

मानवी संवेदनांचा वाहक म्हणून पोस्ट विभागाने आजपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, हा विभाग सामाजिक व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इंटरनेट, मेसेज सेवा आणि ई-मेलच्या युगातही काळानुरूप बदल स्वीकारत स्वतःची उपयुक्तता टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि पोस्ट विभागाने हे यशस्वीपणे साध्य केले आहे. पोस्ट विभागाची ताकद आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ओळखून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विभागाला कालबाह्य होऊ न देता नव्या युगाशी सुसंगत बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

पोस्टल बँकेच्या माध्यमातून गावागावांत बँकिंग सेवा पोहोचली आणि आर्थिक समावेशनात पोस्ट विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. आज विविध क्षेत्रांशी स्पर्धा करत पोस्ट विभागाने 16 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. हा विभाग आजही सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून कार्य करत आहे. या नूतनीकृत टपाल कार्यालयात वारसा आणि विकास या दोन्हींचा समावेश पाहायला मिळतो. आधुनिक सुविधांनी सज्ज असे सुंदर पोस्ट ऑफिस तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जवळपास 2200 ठिकाणी अशा प्रकारची आधुनिक टपाल कार्यालये उभारली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #JanSevaConnect
27

Обсуждение 0

Обсуждение не доступно в веб-версии. Чтобы написать комментарий, перейдите в приложение Telegram.

Обсудить в Telegram

Devendra Fadnavis

4.2K
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Открыть в Telegram