avatar
Devendra Fadnavis
@DevendraGFadnavis
08.05.2026 19:36
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

पुण्यातील आयटी क्षेत्रातील दिग्गज व केपीआयटी टेक्नोलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडितजी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहन उद्योगाच्या आधुनिकीकरणात मोलाचे योगदान देणाऱ्या उद्योजकाच्या निधनाने भारतातील उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

स्व. रवी पंडितजी यांनी नेहमीच उद्योजकता व नावीन्यतेचा पुरस्कार केला. त्यांनी केपीआयटी टेक्नोलॉजीजच्या माध्यमातून ऑटोमोटिव्ह, उत्पादन व ऊर्जा उद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात पुढाकार घेतला. ते पुणे शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासासाठी सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील राहीले. याशिवाय ते 'जनवाणी' सामाजिक संस्था, 'पुणे इंटरनॅशनल सेंटर', 'आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्राम' यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहीले. त्यांच्या निधनामुळे आयटी क्षेत्रातील अभ्यासू व दोन पिढ्यांदरम्यानचा दूवा हरपला आहे, ही या क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
ॐ शांती 🙏
67

Обсуждение 0

Обсуждение не доступно в веб-версии. Чтобы написать комментарий, перейдите в приложение Telegram.

Обсудить в Telegram

Devendra Fadnavis

4.2K
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Открыть в Telegram