avatar
Devendra Fadnavis
@DevendraGFadnavis
06.05.2026 21:42
CMO Maharashtra Tweets:

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल, नाशिकमध्ये गुंतवणुकीचा विक्रमी ओघ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद 2026' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेले नाशिक शहर यापुढील काळात विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिकच्या अर्थव्यवस्थेतील योगदानात लक्षणीय वाढ झाली आहे. आज 300 हून अधिक सामंजस्य करार जिल्हास्तरावर झाले असून, जवळपास ₹13,190 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि सुमारे 32,000 नवीन रोजगार निर्माण होत आहेत. नाशिकचा 3 वर्षांचा एकत्रित (क्युम्युलेटिव्ह) विचार करता, स्थानिक स्तरावर जवळपास ₹31,945 कोटींची गुंतवणूक झाली असून सुमारे 66,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत. विविध क्षेत्रांतील या गुंतवणुकीमागे उद्योगस्नेही धोरण आणि ‘मैत्री’सारखी एक खिडकी योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक मोठ्या उद्योगांकडूनही गेल्या 2 वर्षांत नाशिकमध्ये ₹57,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे. दावोस येथून देखील जवळपास ₹12,000 कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये आणण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत उद्योग येत असून, नाशिक हे या भागातील नवे उद्योग ‘मॅग्नेट’ म्हणून उदयास येत आहे. पुढील काळात येथे आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन परिवर्तन दिसून येईल. राज्यात सर्वदूर उद्योग उभे राहत आहेत. देशातील एकूण जीसीसींपैकी 24% जीसीसी महाराष्ट्रात असून, नाशिकमध्येही जीसीसीसाठी मोठी क्षमता असल्याने या क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात आहे.

उद्योग समूह सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी सहकार्य करत आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाकडून सुमारे ₹33,000 कोटींची विकासकामे हाती घेतली जाणार असून, त्यामुळे उद्योगांसाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल. या गुंतवणुकीमुळे सुमारे 3,00,000 कोटींची अर्थव्यवस्था उभी राहण्यास चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमुद केले.

भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा अविष्कार आणि समता व श्रद्धेचा मेळा म्हणजे कुंभमेळा आहे. नाशिक रिंग रोडमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या सुविधा शाश्वत विकासाला चालना देतील. पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातील आणि डिजिटल व तंत्रज्ञानाचा व्यापक वापर असलेला हा कुंभमेळा ठरेल. प्रत्येक भाविकाला आनंददायी आध्यात्मिक अनुभूती मिळावी, यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #InvestmentSummit #Nashik
82

Обсуждение 0

Обсуждение не доступно в веб-версии. Чтобы написать комментарий, перейдите в приложение Telegram.

Обсудить в Telegram

Devendra Fadnavis

4.2K
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Открыть в Telegram