avatar
Devendra Fadnavis
@DevendraGFadnavis
06.05.2026 21:37
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरावर विधीवत पूजन करून 21 फूट उंच पंचधातूच्या स्तंभावर धर्मध्वज फडकविण्यात आला.

ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारांनी दुमदुमलेल्या वातावरणात धर्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी वेदघोषांच्या साक्षीने होमहवन विधी संपन्न झाला. हा पवित्र सोहळा श्रद्धा, भक्ती आणि सनातन परंपरेच्या दिव्य तेजाने उजळून निघाला.

#Maharashtra #DevendraFadnavis #KalaramMandir
97

Обсуждение 0

Обсуждение не доступно в веб-версии. Чтобы написать комментарий, перейдите в приложение Telegram.

Обсудить в Telegram

Devendra Fadnavis

4.2K
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Открыть в Telegram